फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

धुमकेतु आणि महाकवि

(बलसागर तुम्ही वीराशिरोमणी या चालीवर)

तुम्ही दोघें कोठुनि चुकलां इकडे हो वाटे ?
अन्य श्रेयस् विश्वामधुनी खचित, मला वाटे !          १

निश्चिन्त तुम्ही स्वयंप्रकाशीं अप्रतिहत फिरतां,
केन्द्र सोडुनी दूरवरी हो स्वैरपणें भ्रमतां !              २

भास्करभसित स्थानापासुनि वेध घेत मोदे,
विश्वान्तींचे तमांत शिरतां आपुल्याचि नादें !          ३

जगांतिल महाक्रान्तींचे तें भविष्य सांगाया
तुम्ही येतसां – लावितसांही तें लोकां गाया !          ४

जड धातूचे तुम्ही न दिसतां – तेजस्तत्वाचे !   
कोठुनि अथवा ब्रह्माण्डीं हो स्वेच्छ गमन तुमचें?     ५

कधींमधिं तुम्ही विचित्र पुतळे उगवतसां थाटें !
वदा तर तुम्ही कोठुनि चुकलां इकडे हो वाटे ?        ६


मासिक मनोरंजन, वर्ष १, अंक ३-४, मार्च-एप्रिल १८९५, पृ. ४३-४४
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १०३

केशवसुतांचा जीवनपट

फलक