फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

आहे जीवित काय?

(वृत्त – शार्दूलविक्रीडित)

आहे जीवित काय ? केवळ असे नि:सार भासापरी ?
किंवा स्वप्न असे ? उठे बुडबुडा कालप्रवाहावरी ?
दु:खे काय अनन्त त्यांत भरलीं ? कीं कष्ट जीवा पडे ?
सौख्याचें न तयांत नांव अगदी ऐकावया सांपडे ?            १

नाहीं स्वप्न-न-भास-वा बुडबुडा; जीवित्व साचें असे !
प्रेमानें परमेश्वरास भजतो जो निर्मलें मानसें
लोटी निर्मल सौख्यसिंधुलहरी त्याचेवरी जीवित,
तो आनन्दनिधानशैलशिखरीं क्रीडा करी सन्तत !            २

करमणूक, ११ मार्च १८९३, पृ. १५६

केशवसुतांचा जीवनपट

फलक