फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

‘पण लक्षांत कोण घेतो?’च्या कर्त्यास

(वृत्त- शार्दुलविक्रीडित)

यूरोपीय कथा-पुराण-कविता-ग्रन्थांतुनी चांगले
ते आहेत कितीक थोर उनदे राऊत वाखाणिले;
ज्यांचें ब्रीद-पवित्र राहुनि, जगीं दुष्टांग दण्डुनियां
कीजे सन्तत मुक्त दुर्बल जनां, मांगल्य वाढावया !                १

या त्यांच्या बिरुदामुळेंच बहुधा, सन्मान ते जाहले-
देते या महिलाजनांस पहिला; स्त्रीवर्गकायीं भलें –
ते भावें रतले, क्षणक्षण मुखें स्त्रीनाम उच्चारुनी;
भूपृष्ठस्थित आद्य दैवत जणूं त्यां वाटली भामिनी !               २

‘आहे रे पण कल्पनारचित हें सारेंहि वाग्डम्बर,’
हें कोणी व्यवहारामात्रचतुर प्राणी वदे सत्वर !
‘नाही!- वाचुनिं हें पहा !’ म्हणुनि मी तूझी कथा दावितो,
गेले राउत ते न सर्व अजुनी ! – हा गर्व मी वाहतों!               3

धीरा ! उन्नतिचे पथांत उमदा राऊत तूं चालसी !
नाहीं काय ? करुनि चीत अगदीं ही रुढिकाराक्षसी
टांकानें अपुल्या दुराग्रह जना मर्मी तसा विंधुनी
स्त्रीजातीस असाच काढ वरती!- घे कीर्ति संपादुनी !             ४

१९ ऑक्टोबर १८९२
मासिक मनोरंजन, वर्ष ३, अंक १२, जून १८९८, पृ. २२०
'यथामूल आवृत्ती' १९६७, पृ. ८२

केशवसुतांचा जीवनपट

फलक