फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

प्रीतीची भाषा

(वृत्त – शार्दूलविक्रीडित)

होतों मी बसलों समीप रमणी एके दिनी घेउनी;
‘कोणाची सखि ! तूं ?’ म्हणोनि पुसलें लाडें तियेलागुनी
तीं माझ्या हृदयावरी निज शिरा प्रेमें तिने ठेविलें;
‘कोणाचा सखि! मी ?’ म्हणोनि म्हणतां मातें तिनें चुंबिले.   १

‘माझें कोण ?’ पुसें, तिनें चढविला स्कन्धीं निजीं मत्कर;
‘तुझे कोण?’ म्हणे, तधीं मज तिनें आलिंगिलें सत्वर;
‘माझ्याशीं नच बोलशी, तर तुझा मी नाहिं जा !’ बोललों,
तों अश्रू गळती तिचे टपटपां ! – मी फार पस्तावलों !         २

करमणूक, २२ नोव्हेंबर १८९०, पृ. ३७

केशवसुतांचा जीवनपट

फलक