फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

- प्रत

(जाति-दिंडी)

सिद्ध झालों मी दूर जावयाला
कंण्ठ तेव्हां तव फार भरुनि आला;
मला म्हटलें तूं गद्भद स्वरानें
“खुशालीचें तें वृत्त लिहित जाणें !”            १

“लिहिन” म्हटलें मीं तुला आश्वसाया,
पुढिल केला मीं मुळीं नच विचार;
करीं घेतां परि पत्र हें लिहाया,
खुशालीचें क्षीणत्व दिसे फार !               २

लोचनांला या होस तूं प्रकाश,
मदीयात्म्याचा तूंच गे विकास;
नाडि माझी तव करीं वाहताहे,
हृदय माझें तव उरीं हालताहे !               ३

करा अपुल्या तूं पहा चांचपून,
उरा आपुलिया पहा तपासून;
प्रकृति माझीही तिथें तुज कळेल,
विकृति माझी तुज तिथें आढळेल !         ४

३० मे १८८९
मनोरंजन आणि निबंधचंद्रिका, वर्ष ४, अंक ५, नोव्हेंबर १८८९, पृ. १२६
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ४९

केशवसुतांचा जीवनपट

फलक