फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

प्रीती

(गाणें)

प्रीति मिळेल का हो बाजारीं ?
प्रीति मिळेल का हो शेजारीं ?
प्रीति मिळेल का हो बागांत ?
प्रीति मिळेल कां हो शेतांत ?
प्रीतिची नसे अशि ग मात;
पहा शोधुनी हृदयांत !                      १

नंदनवनामधीं आला
कल्पलतेल बहर भला;
तिचीं हृदयिं बीजें पडलीं,
प्रीती त्यांतुनी अवतरली !
प्रीतिची असे अशि ग मात;
पहा आपुल्या हृदयांत !                   २

प्रेमळ कृत्यांची माळ
प्रियजनकण्ठीं तूं घाल;
द्विगुणित मग तो प्रीति तुला
देईल, न धरीं शंकेला.
प्रीतिची असा असे ग सौदा;
प्रीतिनें प्रीती सम्पादा!                   ३

हृदयीं आलिंगन पहिलें,
चुम्बन मुखकमलीं वहिलें,
आणिक रुचतिल ते चार
३ प्रीतिला होता उपचार !

प्रीती वाढली, गडे ग, सतत
पहा तूं प्रियजनहृदयांत !
प्रीति असेल का ग बाजारीं ?
वेडे ! प्रीति मिळेल का ग शेजारी ?    ४

१८८८
मनोरंजन आणि निबंधचंद्रिका, वर्ष ४, अंक ५,
नोव्हेंबर १८८९, पृ. १२५
काव्यरत्नावली, वर्ष १७, अंक ५

केशवसुतांचा जीवनपट

फलक