फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

जायाचें जग का असेंच?

“Doth then the world go thus, doth all thus move?”
- W. Drummond

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)

जायाचें जग का असेंच ? सगळें ऐसेंच का चालणें ?
ऐसा न्यायच का जगामधिं अम्हांलागीं सदा लाभणें ?
सर्वाला नियमीतसे दृढ असें ते हेंच का शासन ?
देवांनो ! असलेंच काय तुमचें सामर्थ्य द्या सांगुन ?            १

जे आत्मे अपनीतिच्या निबीड त्या धुंदीमुळें आंधळे
त्यांशीं अन्घ विधी सदैव करितो सख्यत्व कीं आपुलें;
ते कीं, आणिक हे सुनीति ! धरिती भक्ती तुझीयावरी
जाती लोटत वादळामधिं अहा ! ते जीर्ण पर्णांपरी !            २

सर्वांचा अवघ्या नियामक असे का हो कुठें ईश्वर ? –
तो आहे, मग सन्मनें हळळती दु:खामधें कां तर ?
नम्रत्वावरि हाय ! उद्धटपणा वर्चस्व कां तें करी ?
कां हो हाल तुटूनि हंत ! पडती निर्दोषितेच्यावरी ?            ३

(वृत्त-उपजाती)
बा धांव देवा ! तर ये त्वरेनें !
ही दुर्दशा थांबिव रे दयेनें;
वा, साधु आणीक असाधु यांचें
समप्रकर्षी युग आण साचें !

केशवसुतांचा जीवनपट

फलक