फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

जास्वंदीची फुलें आणि पारिजाताचीं फुलें

(वृत्त – इंद्रवज्रा)

पहिली :-

“मातींत खालीं पडणें तुम्हांला
कैसें रुचे, हे न कळे आम्हाला.
ही रक्तिमा स्वीय अम्ही, पहा रे,
शाखांवरी नाचवितों अहा रें!”

दुसरी :-

(वृत्त-उपजाती)
“ती रक्तिमा घेउनियां खुशाल
शाखांवरी सन्तत का रहाल ?
मरुन मातींतचि या पडाल,
अज्ञात ऐशा थडग्यांत जाल !

“भाळीं न तें या अमुच्या म्हणून
तो डौल शाखांवरला गणून –
खोटा, लिहाया थडग्यावरी तें
स्वनाम गन्धें झटतोंचि येथे !”

६ ऑगस्ट १८८८
काव्यररत्‍नावली अंक १७, ऑक्टोबर १८८८, पृ. १०
मनोरंजन आणि निबंधचंद्रिका, वर्ष ४, अंक ८,
फेब्रुवारी १८९०, पृ. १३०
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. ३३

केशवसुतांचा जीवनपट

फलक