फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

आमच्याविषयी थोडेसे...

मराठीत संगणक विषयक माहिती देणारी फारच मोजकी पुस्तके आहेत. ग्रामीण भागात संगणक शिकण्यासाठी इंग्रजी ग्रंथ वापरणे विद्यार्थ्यांना अवघड जाते. त्यासाठी संगणकाची पुस्तके केवळ मराठीत प्रकाशित करण्यासाठी संगणक प्रकाशनची स्थापना इ.स. १९९९ मध्ये झाली. १९९९ते २०१३ ह्या तेरा वर्षांत वेब डिझायनिंग : तंत्र आणि मंत्र, ईेमेल व चॅट, काँप्युटर व्हायरस : स्वरुप आणि उपाय, सर्वांसाठी फोटोशॉप, युनिकोड : तंत्र आणि मंत्र वगैरे पुस्तके संगणक प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. २००५ मध्ये नाशिकच्या साहित्य संमेलनात समग्र गडकरी साहित्य असलेली ईबुक सीडी संगणक प्रकाशने उपलब्ध केली. ही सीडी हे मराठीतील पहिले ईबुक मानले जाते. समग्र गडकरी या बरोबरच समग्र केशवसुत, संपूर्ण स्मृतिचित्रे वगैरे मराठी ईबुक्स देखील संगणक प्रकाशन ने प्रकाशित केली आहेत. मोल्यवर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोश हा आजही न्याय व्यवहारात प्रमाण मानला जातो. तो देखील आज सहजासहजी उपलब्ध होत नाही. मोल्सवर्थ शब्दकोशाची सीडी संगणक प्रकाशनने २००८ मध्ये युनिकोड स्वरुपात उपलब्ध केली आहे. त्यात मराठी शब्द शोधण्याची सोय देण्यांत आली आहे.

तसेच २००९ पासून सतत पाच वर्षे संगणक प्रकाशन मराठी युनिकोड मध्ये संकेतस्थळ बनविण्याचे काम करत आहे. यामध्ये http://www. ramganeshgadkari.com , http://www.keshavsut.com  अशी मराठी समग्र साहित्य असलेले संकेतस्थळ तयार केली आहेत.

संगणक प्रकाशन वाटचाल...

१. १९९९ ते २०००
-  वेब डिझायनिंग तंत्र आणि मंत्र
- ईमेल व चॅट

२. २००० ते २००८
-  १००१ वेबसाईट डिरेक्टरी
- काँप्युटर व्हायरस : स्वरुप आणि उपाय
- सर्वांसाठी फोटोशॉप
-  कोरल ड्रा : टीप्स आणि ट्रीक्स
- संगणक जगत 
- मराठी व इंग्रजीतील ४८ ईबुक्स...

३. २००९ ते २०१२
- मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दोकोश
- मराठी युनिकोड : तंत्र आणि मंत्र
- मराठी विषयातील संकेतस्थळे १. समग्र गडकरी २. समग्र केशवसुत ३. धर्मानंद कोसंबी  ४. यशवंतराव चव्हाण साहित्य व ध्वनिफित  ४. मराठी विश्वकोश  ५. मुंबई मराठी पत्रकार संघ ६. आरोग्यविद्या ( आरोग्यविषयी माहिती देणारे)  अशी अनेक मराठी युनिकोड मध्ये संकेतस्थळे...

 

संगणक प्रकाशन
यू-१२८, सेक्टर ४, दुर्गामाता मंदिराजवळ,
ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८
संपर्क : ०२२-२७७९०१२३ / ९९८७६४२७९३

 

केशवसुतांचा जीवनपट

फलक