फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

तुझे नाव मुखीं

(अभंग)

तुझें नाम मुखीं, ध्यान तुझें डोळां,
वृत्ति ह्या चंचळा स्थिरावल्या !            १

चिंता भय दु:खें अवधीं दूर झालीं,
अनाथांचा वाली जवळी केला.            २

भिकार या जगीं इच्छित न मिळे कांही
म्हणुनि तुझे पायीं भिक्षांदेही.            ३

केशवसुत म्हणे देवा दीननाथा
तुझे पायीं माथा वाहियेला !            ४

केशवसुतांचा जीवनपट

फलक