फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

राजा शांतनु

(जाति- आर्या)

जा स्वस्थळास हरिणा सुखें; पहा बाण घेतला मागें;
तुजमागें आलों; पण तव लिप्सा मन्मनीं न ती वागे.        १

मृगयामिषें त्रिपथगा – तीरीं एकान्त साधुनी रानीं
विचरावें स्वैरपणें, या गोष्टीची असे मज शिराणीं.            २

तातें प्रतीपरायें कथिलें हितगूज जें मला, तेणें
भ्रम जडला हृदयाला, अन्य विषय तो मुळींहि मी नेणें.     ३

भ्रमहेतु तूंच अससी गंगे ! तव दर्शनें अहा भंगे –
ताप जनांचा, मग मम होतीं संतप्त केविं हीं अंगे !           ४

ममजन कदक्षिणांकीं बैसुनि पूर्वी तुवांच ना त्यातें
वचन दिलें ‘तुमच्याशीं सुनेचिया जुळिन साच नात्यातें.’   ५

तें देवि ! स्मरसी कीं? पुसतों सुत मी प्रतीपराजाचा,
भ्रमवुनि मज कोठेवरी दु:सह देसी मदंतरा जाचा ?         ६

मी मानव म्हणुनी तव शंकित जरि चित्त होय सुरसरिते,
तरि नच वचनविलंघन करिं, मर्त्यालाहि हीन जें करितें.   ७

देवेन्द्रतुल्य राजे इन्दुकुलोत्तंस विश्वसन्महित,
तद्वंशज मी असता शंकित व्हावें तुवां न हे विहित          ८

कां मग विलंब करिसी? गुंतवितें कोणतें तुला काम ?
धाम न रुचे मज वनीं फिरवी तव पाणिपीडनीं काम.       ९

ये, हो प्रकट लवकरी! पाहूं दे दिव्य मूर्ति तव मग ती
ज्योतिवरी शलभाची होऊं दे तेविं शीघ्र माम गती!         १०

ये ये ! धीर न धऱवें, करवेना काज मज पहा कांही!
वाहीं तुज औत्सुक्यें, जाई नभ त्या भरुन हाकांही !        ११

-'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १५२

केशवसुतांचा जीवनपट

फलक