फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

पद्यपंक्ति

(जाति बालानंद)

पहिल्या दोन ओळी पादाकुलकात आहेत

आम्ही नव्हतों अमुचे बाप,
उगाच, कां मग पश्चात्ताप ?
आसवें न आणूं नयनीं,
मरुन जाऊं एक दिनीं !

अमुचा पेला दु:खाचा
डोळे मिटुनी प्यायाचा;
पितां बुडाशीं गाळ दिसे,
त्या अनुभव हें नांव असे !
फेकुनि द्या तो जगावरी,
अमृत होउं तो कुणा तरी !

जें शिकलों शाळेमाजी,
अध्याहृत ही टीप तया :-
“द्वितीय पुरुषीं हें योजीं,
प्रथम पुरुष तो सोडुनियां !”

- 'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १२६

केशवसुतांचा जीवनपट

फलक