फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

स्फुट विचार

विश्वाचा विस्तार केवढा?
ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा

* * *

सृष्टिकेंद्र तो कवण्या ठायीं?
ज्याच्या त्याच्या आहे हृदयीं.

* * *

स्वीकरणीय जनीं करिते जे
दातव्या, ती कला जाणिजे.

* * *

काय निराशा असे बरें ?
बुजगबाहुलें जगांतले.
मूर्ख भिउनियां त्या गेले,
सुज्ञ बघे तद्रूप खरें !

* * *

स्वयें भयापासुनि पळणें,
भयसमयीं साहस करिती
त्यां अपजय येतां हंसणे
हें विकत असे या जगतीं
शहाणपण या नांवाने !

 

- मासिक मनोरंजन, वर्ष ३, अंक ३
सप्टेंबर १८९७, पृ. ४७
(पहिले तीन स्फुट विचार)
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १२३

केशवसुतांचा जीवनपट

फलक